Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana: मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचं भविष्य उज्वल करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना 2025 असे या योजनेचं नाव असून, मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून ही योजना सुरू केली जाणार आहे. iade.in या ब्लॉगच्या माध्यमातून आपण आज या योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कोणासाठी आहे ही सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना?
ही योजना केवळ मुलींसाठी असून, महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या मुलींच्या नावावर 10,000 रुपयांची मुदत ठेव (एफडी) करण्यात येणार आहे. या रक्कमेची एफडी तिच्या आईच्या बँक खात्यामध्ये केली जाईल, आणि तिच्या भविष्यासाठी ती रक्कम सुरक्षित ठेवली जाईल.
Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana कशासाठी सुरू करण्यात आली?
आजही अनेक ठिकाणी मुलींच्या जन्माबाबत नकारात्मकता पाहायला मिळते. त्याला बदल घडवण्यासाठी आणि लेक वाचवा लेकीला शिकवा या मोहिमेला चालना देण्यासाठी ही योजना खूपच उपयुक्त ठरणार आहे. राज्यात याआधीही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना आणि लेक लाडकी योजना यशस्वीपणे राबवण्यात आल्या आहेत. त्या योजनांचा ठसा लक्षात घेऊन श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टनेही समाजासाठी ही एक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
ट्रस्टने घेतलेला निर्णय
श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना ही ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीने मंजूर केली आहे. आता या योजनेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, सरकारची मान्यता मिळाल्यानंतर योजनेचे सर्व नियम, अटी आणि पात्रता स्पष्ट करण्यात येतील. ट्रस्टकडून ही माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे.
योजना सुरू होण्यामागचा उद्देश
या योजनेमागील प्रमुख हेतू म्हणजे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांचे शिक्षण, सक्षमीकरण यावर भर देणे आणि पालकांना पहिल्या मुलीवर समाधान मानण्यासाठी प्रेरित करणे. अनेक वेळा आर्थिक कारणांमुळे मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते. पण जर त्यांच्या नावावर काही रक्कम सुरक्षित असेल, तर पालकांचे मनोधैर्य वाढते.
ट्रस्टचे इतर सामाजिक उपक्रम
मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत. ट्रस्टकडून मिळालेल्या उत्पन्नाचा उपयोग गोरगरिब रुग्णांना वैद्यकीय सहाय्य देणे, विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करणे, डायलेसिस सेंटरच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवणे अशा कार्यांसाठी केला जातो. त्यामुळे ही नवीन योजना समाजासाठी आणखी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.
पुढील टप्पा काय?
सध्या ही योजना केवळ ट्रस्टने मंजूर केली आहे. आता ती राज्य सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. एकदा सरकारकडून मान्यता मिळाली की, योजनेचे संपूर्ण मार्गदर्शक तत्व, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि एफडी संबंधित माहिती जाहीर केली जाईल. त्या वेळेस iade.in च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर अपडेट्स पोहोचवणार आहोत.
श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे उत्पन्न 133 कोटींवर, योजना राबवण्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळ
maharashtra shri siddhivinayak bhagyalakshmi yojana संदर्भात एक महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न 2024-25 मध्ये विक्रमी 133 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यापूर्वी 114 कोटी उत्पन्न अपेक्षित होते, मात्र भाविकांचा वाढता सहभाग, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांच्या मेहनतीमुळे उत्पन्नात तब्बल 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही माहिती 31 मार्च 2025 रोजी पार पडलेल्या विश्वस्त समितीच्या बैठकीत देण्यात आली.
या बैठकीत ट्रस्टचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली 2025-26 चा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मांडण्यात आला. त्यामध्ये पुढील आर्थिक वर्षासाठी 154 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. या वाढत्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर, श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना अधिक भक्कमपणे आणि प्रभावी पद्धतीने राबवता येणार आहे.
विशेष म्हणजे, जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या नवजात मुलींसाठी श्री सिद्धिविनायक भाग्यश्री योजनाही देखील ट्रस्टकडून राबवण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच या योजनेला राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर, श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना संपूर्ण राज्यात प्रभावीपणे सुरू करण्यात येणार आहे.
या योजनेचा उद्देश मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक पाठबळ देणे असून, iade.in या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही पुढील सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.
निष्कर्ष:
श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना 2025 ही योजना समाजात मुलींबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारी एक महत्त्वपूर्ण पावले आहे. महाराष्ट्रातील पालकांनी आणि नागरिकांनी या योजनेची माहिती ठेवावी आणि वेळेवर अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याचा लाभ घ्यावा. मुलींच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी ही योजना नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर iade.in ब्लॉगला जरूर भेट द्या आणि समाजात अशी सकारात्मक पावले कशी उचलली जात आहेत, यावर प्रकाश टाकणारे इतर लेखही वाचा.