Satbara Utara Check Process: फक्त मोबाईलवर! 1880 पासूनचे सातबारे उतारे पाहा – घरबसल्या जमिनीची संपूर्ण माहिती मिळवा!

WhatsApp Group Join Now

Satbara Utara Check Process: आता शेतकरी आणि नागरिक मोबाईलवर बसून सहजपणे जमिनीचा सातबारा, खाते उतारा आणि फेरफार पाहू शकतात. ही खास सुविधा महाराष्ट्र सरकारने दिली असून, त्यासाठी एक अधिकृत वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर तुम्ही 1880 सालापासूनचे जमिनीचे कागदपत्र पाहू शकता. यामुळे सरकारी कार्यालयात जाऊन वेळ वाया घालवायची गरजच नाही.

ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या वेबसाईटवर जावं लागेल. जर तुम्ही पहिल्यांदाच ही वेबसाईट वापरत असाल, तर ‘New User Registration’ वर क्लिक करा. तिथे तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल, पत्ता, जन्मतारीख, जिल्हा, तालुका आणि पिन कोड भरून एक पासवर्ड तयार करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचं युजर अकाऊंट तयार होईल. जर आधीच अकाउंट असेल, तर User ID आणि Password वापरून लॉगिन करा.

लॉगिन केल्यानंतर ‘Regular Search’ वर क्लिक करा. मग जिल्हा, तालुका, गाव, कार्यालयाचं नाव आणि कागदपत्राचा प्रकार निवडा. नंतर सर्वे नंबर टाका आणि ‘Search’ वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या जमिनीचे जुने सातबारा, खाते उतारे आणि फेरफार मोबाईलवर दिसतील.

ही सुविधा सध्या ज्या गावांची माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे, त्या गावांसाठीच उपलब्ध आहे. त्यामुळे शोध घेताना गावाचं नाव आणि इतर माहिती बरोबर भरा. लक्षात ठेवा, ही माहिती फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरूनच पाहावी.

या ऑनलाइन सातबारा सेवेमुळे शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना मोठा फायदा होतो. कोणत्याही कागदपत्रासाठी तहसील कार्यालयात जावं लागत नाही, वेळ आणि पैशांची बचत होते. त्यामुळे जर तुम्हाला 1880 पासूनचे सातबारा, खाते उतारे किंवा फेरफार पाहायचे असतील, तर ही सुविधा वापरा – अगदी सोप्पं आणि मोफत!

Ladki Bahin Yojana 2025: लाडक्या बहिणींना किती रुपये मिळाले? तुमचं नाव यादीत आहे का? लगेच तपासा!

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !