Arvind Kejriwal Net Worth 2025: अरविंद केजरीवालचं 2025 मध्ये इतकं नेट वर्थ? तुम्ही अंदाजही लावू शकणार नाही!

WhatsApp Group Join Now

Arvind Kejriwal Net Worth 2025: 2025 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवडणूक अर्जात त्यांच्या एकूण संपत्तीबाबत माहिती दिली आहे. या माहितीनुसार, केजरीवाल यांच्याकडे सुमारे 4.2 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. त्यांच्या नावावर फक्त 50 हजार रुपये रोख रक्कम आहे आणि विविध बँक खात्यांमध्ये 2.96 लाख रुपये जमा आहेत.

‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले. लोक त्यांच्या वैयक्तिक आणि आर्थिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात, म्हणून येथे आपण त्यांची संपूर्ण माहिती पाहूया.

अरविंद केजरीवाल यांची माहिती (Biography)

जन्म: 16 ऑगस्ट 1968
जन्मस्थान: हरियाणा, भारत
राजकीय पक्ष: आम आदमी पार्टी (AAP)
शिक्षण: आयआयटी खरगपूर
व्यवसाय: सामाजिक कार्यकर्ता, राजकारणी

अरविंद केजरीवाल हे ‘आम आदमी पार्टी’चे राष्ट्रीय संयोजक आहेत आणि दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या पहिल्या कार्यकाळाची सुरुवात 28 डिसेंबर 2013 रोजी झाली होती आणि त्यांनी 14 फेब्रुवारी 2014 पर्यंत हा पदभार सांभाळला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते सामाजिक कार्यकर्ता होते. 2006 साली त्यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ देण्यात आला होता.

त्यांनी आयआयटी खरगपूर येथून पदवी घेतल्यानंतर 1992 मध्ये IRS (Indian Revenue Service) मध्ये प्रवेश केला आणि दिल्लीच्या आयकर विभागात अधिकारी म्हणून काम केले.

अरविंद केजरीवाल यांची एकूण संपत्ती – Arvind Kejriwal Net Worth 2025

2025 च्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या निवडणूक अर्जात अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या 4.2 कोटी रुपयांच्या एकूण कुटुंबीय संपत्तीची माहिती दिली आहे. त्यापैकी 1.73 कोटी रुपये त्यांच्या नावावर असलेली वैयक्तिक संपत्ती आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्याकडे स्वतःची कार नाही, मात्र त्यांच्या पत्नीच्या नावावर एक बलेनो कार आहे.

केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे 1.7 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 1.5 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. रोख रकमेबाबत बोलायचं झालं, तर केजरीवाल यांच्याकडे 50 हजार रुपये, तर त्यांच्या पत्नींकडे 42 हजार रुपये रोख असल्याची माहिती आहे. त्यांची वार्षिक उत्पन्न देखील मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाल्याचं नमूद केलं आहे.

Ladki Bahin April Installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! एप्रिलचा हप्ता मिळणार ‘या’ दिवशी?

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !