Ladki Bahin Yojana 2025: मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक खूपच उपयुक्त योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 ची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाते. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.
ही योजना जुलै 2023 पासून सुरू झाली असून, आतापर्यंत 9 हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता सर्व महिलांना “माझी लाडकी बहीण योजना 10वा हप्ता” म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याची उत्सुकता लागली आहे.
सामान्यतः, मागील हप्त्यांचा विचार केला तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 7 मार्चपासून खात्यात जमा होऊ लागले होते. यावरून अंदाज घेतला तर एप्रिल महिन्याचे पैसे सुद्धा 7 किंवा 8 एप्रिलपासून जमा होण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्यात रामनवमी आणि अक्षय्य तृतीया यांसारखे शुभ सण येत असल्यामुळे सरकारकडून एप्रिलचे पैसे ह्या शुभ दिवशी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सरकारकडून यासंदर्भात अजून कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या – ज्या महिलांनी या योजनेच्या अटी पूर्ण केल्या नाहीत, त्या महिलांची नावे योजनेतून वगळली जात आहेत. त्यामुळे काही महिलांना माझी लाडकी बहीण योजना 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. दर महिन्याला अपात्र महिलांची यादी अपडेट केली जाते.
म्हणून, जर तुम्ही ही योजना घेत असाल तर तुमच्या नावाची यादीत खात्री करून घ्या आणि अटी योग्य प्रकारे पाळल्या आहेत का ते नक्की तपासा.
Free Scooter Yojana 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! सरकार देणार मोफत स्कूटी – लगेच अर्ज करा!