Ladki Bahin April Installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! एप्रिलचा हप्ता मिळणार ‘या’ दिवशी?

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin April Installment: लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जिच्यामार्फत राज्यातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही योजना जुलै २०२३ पासून सुरू झाली असून, अनेक महिलांच्या खात्यात दर महिन्याचे पैसे नियमितपणे जमा होत आहेत.

एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार?

सध्या एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि अनेक महिलांना एकच प्रश्न सतावत आहे – “एप्रिलचा हप्ता कधी येणार?
पूर्वीच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते ७ मार्चपासून मिळायला सुरुवात झाली होती. त्यामुळे आता अंदाज व्यक्त केला जात आहे की एप्रिलचा हप्ता ७ किंवा ८ एप्रिल २०२५ रोजी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

रामनवमीच्या दिवशी मिळू शकते गुड न्यूज

यावर्षी रामनवमी ६ एप्रिलला आहे. त्यामुळे या शुभ दिवशीच सरकार एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत घोषणा करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अधिकृत घोषणा मात्र बाकी

तरीही, सरकारकडून अधिकृत तारीख अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या महिलांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सर्व महिलांना मिळणार नाही हप्ता

एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक महिलेला हा हप्ता मिळणार नाही. ज्या महिलांचे नाव योजनेच्या पात्रतेतून वगळण्यात आले आहे, किंवा ज्यांचं अपडेशन पूर्ण नाही, त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही.

Free Scooty Scheme: सरकार देणार महिलांना मोफत स्कुटी – आत्ताच बघा पात्रता आणि कागदपत्रं

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !