Motorola Edge 60 Fusion vs Galaxy A26 – कोणता स्मार्टफोन खरंच ‘पैसा वसूल’ आहे?

WhatsApp Group Join Now

Motorola Edge 60 Fusion vs Galaxy A26: जर तुम्ही असा स्मार्टफोन शोधत असाल ज्यामध्ये फीचर्सही भन्नाट असावेत आणि किंमतही परवडणारी – तर Motorola आणि Samsung या दोन प्रसिद्ध ब्रँड्सनी नुकतेच भारतात ₹२५,००० च्या आत नवीन मिड-रेन्ज स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Motorola Edge 60 Fusion आणि Samsung Galaxy A26 हे दोन्ही फोन सध्या चर्चेत आहेत त्यांच्या आकर्षक फीचर्समुळे. पण या दोघांमध्ये खरंच कोणता फोन ‘पैसा वसूल’ आहे? हे जाणून घेण्यासाठी आपण दोन्ही फोनची तुलना करून पाहूया.

डिझाइन आणि डिस्प्ले – कोणाचा लूक अधिक आकर्षक?

Motorola Edge 60 Fusion या फोनमध्ये वेगन लेदर फिनिश दिलं आहे, ज्यामुळे फोनला एक प्रीमियम आणि स्लीक लूक मिळतो. याशिवाय, हा फोन IP69 आणि IP68 रेटिंगसह येतो, म्हणजेच पाणी आणि धुळीपासून चांगले संरक्षण मिळते. दुसरीकडे Samsung Galaxy A26 हा फोन ग्लास आणि प्लास्टिक बिल्डसह येतो. लूकच्या बाबतीत तो Samsung च्या इतर A सिरीजप्रमाणेच दिसतो. मात्र त्याला IP67 रेटिंग मिळाले आहे, जे Motorola च्या तुलनेत थोडं कमी वाटतं.

डिस्प्ले – कुणाचं स्क्रीन अनुभव उत्तम?

Motorola Edge 60 Fusion मध्ये 6.67 इंचांचं pOLED quad-curved डिस्प्ले दिलं आहे. यामध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट, 1.5K resolution आणि तब्बल 4500nits ची पीक ब्राइटनेस मिळते – म्हणजे उजेडातही स्क्रीन खूपच स्पष्ट दिसतो.

तर Samsung Galaxy A26 मध्ये 6.7 इंचांचं FHD+ Super AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये तसंच 120Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. Samsung च्या फोनमध्ये Corning Gorilla Glass Victus+ चं प्रोटेक्शन दिलं आहे, तर Motorola मध्ये Corning Gorilla Glass 7i वापरण्यात आलं आहे.

Ladki Bahin Yojana Aadhar Card Link: ‘हे’ काम केलं नाही तर लाडकी बहिण योजनेचा हप्ता अडकणार – आधार लिंकची पूर्ण माहिती!”

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !